Junior College of Arts, Commerce, Vocational and Science, Phondaghat


JR college

The PES has started Junior college of Arts and Commerce in 1975, to give further opportunity of higher secondary education to the students of Phondaghat and region. To make the students employable and skilled the PES has started the wing of Minimum Competency Vocational Courses (funded by Central Govt.) in 1989. The students are getting opportunity of job in the local market and trade, after completion of this course. The students from Phondaghat had to travel more than 20 km for taking higher secondary education in Science, so Science wing has been started since 2012 (unaided) by PES. The Junior college students also participate in various academic and co-curricular activities and get success. As the number of Junior College students got increased, the HSC Board has sanctioned an HSC examination centre to PES since 2013. The graph of academic progress of the students is always rising.

मित्रहो !  फोंडाघाट पंचक्रोशितील वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता व ‘उच्चमाध्यमिक’ व्यवसाय शिक्षणापासून विद्यार्थी वर्ग वंचित राहू नये कारण विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचं खर काम शिक्षणच करू शकतं हा मानस डोळ्यासमोर ठेवून ‘फोंडाघाट एज्यु. सोसायटीने ’ सन १९७५ – ७६ या शैक्षणिक वर्षात ज्यु. कॉलेजची स्थापना करून विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा दिला. हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य चालू असताना प्रथम कला शाखा तदनंतर विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेची आवड लक्षात घेता व बॅंकिंग क्षेत्र व इतर क्षेत्रात आपले विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी सन १९८१ – ८२ या शैक्षणिक वर्षात संयुक्त तुकडी सुरू केली.व्यावसायिक, व्यापार, उद्योग, इ. क्षेत्रात सुध्दा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून आपलं भविष्यातील जीवनचरित्र चालवावं व त्यातूनच व्यावसायिक क्षेत्रात आकाशाला गवसणी घालावी या हेतूने सन १९८६ च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार १९८९ साली इयत्ता ११ वी व १२ वी किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम/ एम. सी. व्ही. सी. सुरू करण्यात आला. वाणिज्य शाखेकडील विद्यार्थ्यांचा वाढता ओढा लक्षात घेता सन २००८ -२००९ ला विनाअनुदान तत्त्वावर वाढीव वाणिज्य तुकडी सुरू केली. त्यानंतर विज्ञान शाखेमध्ये इतर कॉलेजमध्ये आपल्या पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना ११ वी सायन्स प्रवेशाला लागणारी भरमसाठ फी आपल्या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी इच्छा असून ‘विज्ञान’ पासून वंचित राहतात हे लक्षात घेवून सन  २०१२ – १३ साली संख्येने इ. ११ वी ‘ विज्ञान वर्ग ’ सुरू केला, १९७५ साली संख्येने ‘ज्युनि.कॉलेजच्या ’ रूपात लावलेल्या या रोट्याखाली आज असंख्य विद्यार्थी शिक्षण घेताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

 
उद्देश :-

फोंडाघाट पंचक्रोशितल पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या तसेच सर्व जातीधर्माच्या मोलमजूरी करणा-या, कष्टकरी, गोरगरिब तळागाळातील मुलांना उच्च माध्यमिक शिक्षण सहजा सहजी उपलब्ध करून देणेसाठी तसेच विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व व सर्वांगिण विकास व्हावा, आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि आजच्या आधुनिक युगात वावरताना येणा-या आव्हानांना ही मुले सामोरी जातील हा प्रमख उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्ञानदानाचा हा प्रवास अखंड व अविरत चालू ठेवून अद्ययावत शिक्षण व तंत्रज्ञान या विद्यार्थ्याना मिळावे हा संस्थेचा मानस आहे.

ध्येय :-

फोंडाघाट पंचक्रोशितील ग्रामिण डोंगराळ भागातील तसेच आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ‘उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम’ शिक्षण मिळण्यासाठी प्रोत्साहन देणे विशेष करून मुलींना ‘उच्च माध्यमिक’ शिक्षण मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मसन्मान व स्वत:च्या विकासाबरोबर देशाचा विकास ह्या गुणांची जाणीव व्हावी हे प्रमुख ध्येय ठेवून हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य अखंड आणि अविरत चालू ठेवावे हे फोंडाघाट एज्यु. सोसायटीचे व प्रशालेचे प्रमुख ध्येय आहे.

उद्दिष्ट्ये :-

शालेय व सहशालेय उपक्रमामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तसेच आपल्या कॉलेजमधील विद्यार्थी चारित्र्यसंपन्न व्हावेत हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.तसेच पर्यावरण सारख्या विषयांच्या माध्यमातून आणि इतर सहशालेय उपक्रमामधुन अनुशासन, श्रमसंस्कृती व श्रमप्रतिष्ठा त्याचबरोबर सामाजिक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयारी करून घेणे व त्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

१. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, स्थानिक गरजा आणि कौशल्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रशालेमध्ये तसेच ज्युनि. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या सहशालेय उपक्रम घेतले जातात.

२. ज्युनि. कॉलेजमध्ये (+२) MCVC स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन केले जाते. तसेच ‘विज्ञान’ वर्गातील व व्यावसायक अभ्याक्रम वर्गातील विद्यार्थ्यांना दरवर्षी तज्ञ मार्गदर्शन बोलावून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाते.

३. विज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना आजच्या आधुनिक युगातील ज्या परीक्षा (उदा. मीट, जेई, सी.ई.टी) सारख्या परीक्षासंदर्भात इतर इंजिनिअरींग कॉलजचे तज्ञ मार्गदर्शक बोलावून मर्गदर्शन केले जाते.

४. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, स्टडी प्रोग्राम, चर्चा मंडळ इ. योजना राबविल्या जातात. गेस्ट लेक्चर, इंग्लिश स्पिकींग मार्गदर्शन, ओ. एच. पी. द्वारे परिणामकारक विषय मांडणी, वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, इ. संदर्भात मार्गदर्शन व नियोजन केलं जातं.

५. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण होण्याकरिता नामवंत ज्येष्ठ कवी, साहित्यिक लेखक यांना आमंत्रित करून मार्गदर्शन केलं जातं

६. महान व्यक्तिंच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साज-या केल्या जातात.

७. गीतगायन व समूहगीत स्पर्धेच आयोजन केले जाते.

८. प्राथमिक आरोग्य केंद्र (P.H.C.) च्या सहकार्याने आरोग्यविषयक गरजा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जातात. त्याचबरोबर मूलींसाठी उत्कर्षा योजना राबविली जाते. त्यातूनच मूलींच्या शारिरिक व मानसिक समस्यांचे निराकरण केले जाते.

९. सांस्कृतिक क्षेत्रात स्नेहसंमेलन, एकपात्री प्रयोग, पथनाट्य, नाटिका, भजन, गायन या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते.

१०. कॉलेजमध्ये सहलींच आयोजन करून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, पर्यटन स्थळांविषयी माहिती देण्यासाठी शैक्षणिक सहलींच आयोजन केलं जातं.

११. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातुन वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट दिली जाते. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुण निर्माण व्हावेत हा यामागील उद्देश आहे व त्याचंदेखील आयोजन कॉलेजमध्ये केले जाते.

कला विभाग (Arts Faculty)

इंग्रजी , मराठी , हिंदी , अर्थशास्त्र , इतिहास , भुगोल , पर्यावरणशास्त्र  , आरोग्य व शा. शिक्षण

वाणिज्य विभाग (Commerce  Faculty)

इंग्रजी , मराठी , अर्थशास्त्र , भुगोल , बुक किपिंग व अकौ.  , वाणिज्य संघ. व व्यवस्थापन ,पर्यावरणशास्त्र  , आरोग्य व शा. शिक्षण

उच्च माध्य व्यावसाय अभ्यासक्रम (HSC Vocational)

(वाणिज्य गट) (Commerce Group)

अ) अनिवार्य विषय

इंग्रजी    मराठी    जनरल फाऊंडेशन कोर्स   पर्यावरणशास्त्र   आरोग्य व शा. शिक्षण

ब) ऐच्छिक विषय:-

१. अकौटिंग अ‍ॅंड  ऑफिस मॅनेजमेंट

ऑफिस मॅनेजमेंट अ‍ॅंड ऑर्गनायझेशन

फंडामेंटल ऑफ अकौंटिंग

फंडामेंटल ऑफ़ कास्टिंग अ‍ॅंड ऑडिटिंग

२.  मार्केटिंग अ‍ॅंड रिटेल मॅनेजमेंट

मार्केटिंग अ‍ॅंड सेल्समनशीप

रिटेल मार्केटिंग सर्विसेस

रिटेल मार्केटिंग

३. लॉजिस्टिक अ‍ॅंड सप्ल्याय चेन मॅनेजमेंट

पर्चेस मॅनेजमेंट

लॉजिस्टिक अ‍ॅंड वेअरहाऊसिंग

बॅंकिंग अ‍ॅंड अकौंटिंग

टिप :- विद्यार्थ्याने ऐच्छिक विषयामधून कोणत्याही एका विषयाची निवड करावी.

विज्ञान विभाग 

इंग्रजी , मराठी, भौतिक शास्त्र ,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र ,गणित/भुगोल ,पर्यावरणशास्त्र, आररोग्य व शा. शिक्षण

इ. ११ वी आर्टस, कॉमर्स, व्होकेशनल अ‍ॅंड सायन्स विभाग 

    आवश्यक  कागदपत्रे –

१. इ. १० वी उत्तीर्ण गुणपत्रक

२. शाळा सोडल्याचा दखला

३. आधार कार्ड झेरॉक्स

४. जातीचा दाखला

५. विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज

६. दोन पासपोर्ट साईज फोटो

गणवेश 

  १. मूलांसाठी – निळी फूल पॅंट

निळा – पांढरा चौकटी शर्ट

  २. मूलींसाठी – निळा पायजमा

निळा – पांढरा चौकटी टॉप

निळी ओढणी, (चुडीदार)

१. चाचणी क्र. ०१

२. प्रथम सत्र परीक्षा

३. चाचणी क्र. ०२

४. द्वितीय सत्र परीक्षा

५. सराव परीक्षा

६. पूर्व परीक्षा इ. १२ वी

 

मूल्यमापन पध्दती 

१. लेखी परीक्षा

२. अंतर्गत मुल्यमापन

३. प्रात्यक्षिक परीक्षा

विशेष मार्गदर्शन 

वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी अभ्यासिका वर्ग त्याचबरोबर स्पेशल बॅच तयार करण्यात आली. व त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेची सर्वांगिण तयारी करून घेतली  जाते.

सुसज्ज प्रयोगशाळा –

विज्ञान विभागासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रयोग करता यावेत यासाठी भौतिक, रसायन,जीवशास्त्र इ. विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली.

संगणक कार्यशाळा –

संस्थेने इंटरनेट कनेक्टीव्हीटीसह सुसज्ज संगणक कार्यशाळा उपल्ब्ध करून दिली आहे. व्यवसाय शिक्षणाच्या मुलांना इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, टॅली, इ – कॉमर्स, इ. मार्केटींग, इ. टेंडरींग, ऑन लाईन माहिती भरणे इ. मोफत प्रशिक्षण देण्याची सुविधा

ग्रंथालय:-

ग्रंथपालाचे नाव – सौ. तायशेटे समृध्दी विशेषा

१. इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना सिध्दीविनायक ट्रस्टमार्फत राबविल्या जाणा-या योजनेकडून विद्यार्थ्यांना पुस्तकांचा मोफत लाभ मिळतो.

२. कला, वाणिज्य व सायन्स साठी उपलब्ध पुस्तके – १५२२

३. व्यवसाय शिक्षण विभाग – ८१४

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसंदर्भात पालकांशी संवाद साधण्यासाठी पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली.

           शैक्षणिक शिक्षण फि सवलत

अ. क्र. शैक्षणिक सवलतीचे नांव

आवश्यक अर्हता

इ. बी. सी. सवलत योजना इ. ११ वी व १२ वी मुलांसाठी १ विहित नमुन्यातील अर्ज

२. रू. २ लाखाच्या आतील

सरपंच दाखला

३. कुटुंबाचा दाखला

२. इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व मुलींसाठी मोफत शिक्षण योजना

पालकांचे प्रतिज्ञापत्र

३.

प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण योजना व परिक्षा फि

पालकांचा विहित नमून्यातील अर्ज

४.

माध्यमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण योजना व परीक्षा फि

पालकांचा विहित नमून्यातील अर्ज

भारत सरकार शिष्यवृत्ती

  अनु. जाती./ वि. जा. भ. ज. / विमाप्र / इमाव प्रवर्गातील मुला / मुलींना

अ. क्र.

शैक्षणिक सवलतीचे नांव

आवश्यक अर्हता

भारत सरकार शिष्यवृत्ती इयत्ता ११ वी व १२ वी मुला / मुलींकरता

१. तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला

२. जातीचा दाखला

३. रहिवासी दाखला

४. रेशन कार्ड

५. आधारकार्ड

६. बॅंक पासबुक झेरॉक्स

२.

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती इ. ११ वी व १२ वी मुला / मुलींकरता

१. मागील इयत्तेत ७५५ टक्केपेक्षा गुण आवश्क

२. जातीचा दाखला

३. गुणपत्रक

४. रेशन कार्ड

५. आधारकार्ड

६. बॅंक पासबूक झेरॉक्स

             अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

  मुस्लीम / ख्रिश्चन / जैन / पारशी / बौध्द / या प्रवर्गातील  विद्यार्थ्यांकरीता

अ. क्र.

शैक्षणिक सवलतीचे नांव

आवश्यक अर्हता

इयत्ता ११ वी व १२ वी विद्यार्थ्यांना

१. रु. १ लाखाच्या आतील तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला

२. प्रवर्गाचा पुरावा

३. रहीवासी दाखला

४. रेशन कार्ड

५. आधारकार्ड

६. बॅंक पासबुक झेरॉक्स